नवी दिल्ली : देशातील एका विमानतळावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विशेष मुलाला म्हणजेच दिव्यांग मुलाला इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर कंपनीच्या आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
संबंधित दिव्यांग मुलाचे त्याचे वर्तन सामान्य नसल्याचे कारण देत इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासह पालकांना विमानात प्रवेश नाकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या घटनेविषयी राग व्यक्त केला आहे.
Here is the video of the incident that happened at Ranchi airport where @IndiGo6E airlines denies boarding to a special need child along with his child.
Seems lack of empathy from Indigo staff, not the first time though.
Indigo to issue a statement shortly. @JM_Scindia https://t.co/5ixUDZ009a pic.twitter.com/SyTNgAQIT6— Dibyendu Mondal (@dibyendumondal) May 8, 2022
रांची विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, इंडिगोच्या कर्मचार्यांनी असेही जाहीर केले हे मूल इतर प्रवाशांसाठी धोकादायक आहे आणि प्रवासासाठी योग्य ठरवण्याआधी त्याला सामान्य व्हावे लागेल. दरम्यान, या विमानात एक डॉक्टर होते. आम्ही त्याची मदत करु असे त्यांनी आश्वासन दिले. तरीही इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मुलासह त्यांच्या संबंधित पालकांना विमानतळावरच ठेवून ते विमान हैदराबादकडे रवाना झाले.
‘एअरलाइन्सकडून विशेष गरज असलेल्या मुलाला प्रवेश नाकारला जातो. इंडिगोच्या कर्मचार्यांमध्ये सहानुभूतीचा अभाव दिसतो. हे पहिल्यांदा असे घडलेले नाही. इंडिगो लवकरच या प्रकरणी निवेदन जारी करणार आहे.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विमानतळावरील एका प्रवाशाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घटना उघडकीस आणली. जो दुसर्या विमानाची वाट पाहत होता. व्हिडिओत विमानतळावरील अनेक प्रवासी इंडिगोच्या कर्मचार्यांशी वाद घालताना दिसत आहेत. यावेळी विशेष मुलगा व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे. इंडिगो एअरलाइन्सने त्या मुलाला रांची विमानतळावर विमानात चढण्यापासून रोखल्यामुळे तो नाराज दिसत होता. या घटनेची गंभीर दखल घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशी सुरु केली आहे.