मुंबई – चार वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते नितीन चंद्रकांत देसाई यांचे अकाली निधन हे हिंदी चित्रपटसृष्टीची अवस्था आणि दुर्दशा या दोन्हींचे अत्यंत दु:खद संकेत आहे. नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईस कंपनीच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबत रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर भांदवी कलम 306 अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यावर आता आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन कंपनीनेच कर्ज दिले आणि वसुलीसाठी थकित मालमत्ताही विकत घेण्याचं काम याच कंपनीने केल्याचं म्हटलं आहे.
Shockingly, in Nitin Desai’s suicide case, both ESL Finance, the company that gave him the loan and Edelweiss Asset Reconstruction Company (ARC), which bought the assets of the overdue loans belong to the same #Edelweiss Group.
This is blatantly against banking regulations. On…— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 5, 2023
सत्यजित तांबे यांचे ट्विट
धक्कादायक म्हणजे, नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात, त्यांना कर्ज देणारी ESL फायनान्स आणि थकीत कर्जाची मालमत्ता विकत घेणारी Edelweiss Asset Reconstruction Company (ARC) या दोन्ही एकाच #Edelweiss Group च्या आहेत.
हे बँकिंग नियमांच्या विरुद्ध आहे. एकीकडे, सावकार कर्जदाराला त्रास देतो असे दिसते आणि दुसरीकडे ते कर्जदाराची मालमत्ता स्वतः विकत घेतात. त्यामुळे सरकारने अशा बाबींची बारकाईने छाननी करून अशा प्रकारची छळवणूक होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.