नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील इंदिरापुरम या भागातील झोपडपट्टीत भीषण आगीची घटना घडली. इंदिरापुरमच्या झोपडपट्ट्यांतील आगीच्या ज्वाळा दुरूनच दिसत होत्या. या दुर्घटनेत १०० गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, झोपडपट्टीत ठेवलेल्या घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागताच पाहता पाहता आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. इंदिरापुरमच्या झोपडपट्टीत आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले.
उत्तर प्रदेश: गाजियाबाद के इंदिरापुरम में स्लम इलाके में आग लग गई। दमकल की गाड़ी घटनास्थल पर मौजूद है।
श्री कृष्णा गौसेवा के राष्ट्रीय अध्यक्ष ने बताया, “कबाड़ में आग लगने के कारण 100 से ज्यादा गायों की जल कर मृत्यु हो गई है। सभी गाय बिना दूध देने वाली गाय थीं।” pic.twitter.com/jfGjDLxwPT
— ANI_HindiNews (@AHindinews) April 11, 2022
श्री कृष्ण गोसेवेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी,”रद्दीमध्ये लागलेल्या आगीमुळे १०० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. सर्व गायी दुध न देणाऱ्या होत्या.” या भीषण दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गाझियाबादचे डीएम आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीच्या बाजूला कचरा पडलेला होता. जिथे सुरुवातीला आग लागली आणि नंतर या आगीने रौद्ररूप धारण केले. थोड्यावेळातच आगीने संपूर्ण परिसराला वेढले त्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. सुरुवातीला आग लागल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पाणी टाकण्यास सुरुवात केली, मात्र प्रचंड उकाडा आणि वाऱ्यामुळे अधिकच पसरत गेली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.