नांदेड : बिलोली तालुक्यातील शंकरनगर शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर चार शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीची प्रकृती नाजूक आहे. याप्रकरणी चारही नराधमांविरोधात रामतीर्थ पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीने घडला प्रकार आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नराधमांनी पीडितेला अश्लील चित्रपट दाखवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिक्षक सय्यद रसूल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील आणि धनंजय शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपीने पोबारा केला आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.