हादरवणारा आकडा ! 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात होणार 10 लाखांहूनही अधिक मृत्यू

वॉशिंग्टन – अमेरिकेतील अव्वल जागतिक आरोग्य संशोधन संस्थेने असा अंदाज लावला आहे की, कठोर उपाययोजना न केल्यास 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात 10 लाखाहूनही जास्त जणांचा करोनाने मृत्यू होऊ शकतो.

या प्राणघातक रोगामुळे, गेल्या आठवड्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत 78% वाढ झाली आहे. अमेरिकेत, बायडेन प्रशासनातील उच्च अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॅक सलिव्हियन यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, भारतात करोना नियंत्रणाबाहेर गेला आहे.

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्‍स अँड इव्हॅल्युएशनने म्हटले आहे की, आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी कठोर उपाययोजना तसेच सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याबाबत भारताची परिस्थिती खूपच वाईट दिसते. या संस्थेचा अंदाज आहे की 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात 1,019,000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हे अंदाज 25 ते 30 एप्रिल दरम्यानच्या आकडेवारीवर आधारित आहे.

या संस्थेच्या म्हणण्यानुसार, जर पुढच्या आठवड्यात 95% परिस्थिती नियंत्रणात आणली तर हा आकडा 73 हजारांनी कमी होऊ शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.