भोपाळ – भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता आणखी एक नवीन वळण मिळालं आहे. या प्रकरणी प्राथमिक तपासात घरगुती कारणामुळे आत्महत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर या प्रकरणाच्या अनेक बाजू समोर आल्या. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शरद, विनायक आणि पलक हे तिघे मिळून भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करीत होते. पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आलं की, महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध होते, यातील 2 तरुणी तर आयएएस आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणात दोन महिन्यांपर्यंत पोलिसांनी काहीच सुगावा लागत नव्हता. त्यामुळे फाइल बंद करण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र एका फोनमुळे महाराजांच्या सुसाइडच्या सहा महिन्यानंतर विनायक, पलक आणि शरद यांनी अटक करण्यात आली होती.
इंदुर जिल्हा न्यायालयाने मुख्य सेवादार विनायक, ड्रायव्हर शरद आणि एका पलकला दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने तिघांना एकूण 6 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : मुख्य सेवक, चालक व केअरटेकर दोषी
हे तिघेही भय्यू महाराजांचं आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याची माहिती समोर आली होती. भय्यू महाराजांनी सूसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेख केला होता. कारण विनायक हा भय्यू महाराजांची गेल्या 16 वर्षांपासून सेवा करत होता.