शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर – शिवसेना-भाजपा-मित्र पक्षाच्यावतीने शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांच्या कडे अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रा. संजय मंडलिक यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश अबीटकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आरपीआयचे अध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते.

कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने अर्ज दाखल केला असून हा अर्ज भरताना भाजपा चे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हे अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला. परंतु शिवसेना-भाजपा-मित्रपक्षांचे जिल्ह्यातील सर्व नेते, आमदार पदाधिकारी मदत करतील अशी अपेक्षा शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.