Shivajirao Adhalrao Patil । मागील काही दिवसापासून सुरु असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. त्यामुळे महायुतीने याठिकाणी उमेदवार आयात केल्याचे दिसून येतंय.त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरलाय.
होळीनंतर येत्या 26 मार्च रोजी शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकाँग्रेस (अजित पवार )गटामध्ये मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आढळराव पाटील हेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे आता नक्की झालंय. एकनाथ शिंदेंनी जुलै 2022 मध्ये बंड केल्यावर आढळराव पाटील त्यांच्यासोबत गेले होते.
आजही त्यांचे शिंदेंशी कुठलेही मतभेद नाहीत. पण महायुतीच्या वाटाघाटीत शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली, उमेदवारी मात्र आढळरावांना देण्याचं ठरलं. म्हणून मग एकनाथ शिंदेंनी एकाप्रकारे आपला उमेदवार निर्यात करण्याचं ठरवलं, आणि त्यामुळे आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
मग उमेदवारी मिळणार का नाही हे विचारू नका Shivajirao Adhalrao Patil ।
पक्षप्रवेशाविषयी बोलताना.”माझा पक्ष प्रवेश माझ्या मतदारसंघात 26 मार्चला होणार आहे . राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मी निव़डणुकीला उभा राहणार असून ही जागा नक्कीच जिंकणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालेलं आहे. या दोघांनी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली असून त्यांनी माझ्या पक्षप्रवेशाला क्लीन चिट दिली. माझा पक्षप्रवेश होत आहे, त्यामुळे उमेदवारी निश्चित होणार का असे प्रश्न विचारण्याची गरज नाही.
मागच्या निवडणुकीचा बदला घेणार Shivajirao Adhalrao Patil ।
यावेळी बोलताना आढळराव म्हणाले की, “गेल्या वेळचा बदला घेण्यासाठीच आपण निवडणुकीला उभा राहणार असून यावेळी निवडून येणार याची 100 टक्के खात्री आहे. माझं जे कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार पहिली निवडणूक मी तीस हजाराने जिंकलो, दुसरी मी एक लाख 80 हजार जिंकलो, तिसरी तीन लाखाने जिंकलो. आता ही निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल. त्यामुळे यावेळी माझा विजय हा नक्की आहे.”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.