मुंबई : ८ जानेवारी रोजी कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला शिवसेना सहभागी होणार आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देशातील कामगार संघटनेचे दिल्लीत अधिवेशन झाले होते. त्यावेळी संघटनांनी संपाची हाक दिली होती.
शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील संपात सहभागी होणार आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत म्हणाले कि, देशातील कामगाराच्या न्याय हक्कासाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. देशात बेरोजगारी वाढत असून रोजगाराचे प्रश्न बिकट होत आहेत.
हा संप सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात पुकारण्यात येणार आहे. या देशव्यापी संपाला काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, शेतकरी कामगार पक्ष आदी पक्षांचा पाठिंबा आहे.