Shiv Sena MLA Sanjay Gaikwad । शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. ते नेहमीच विरोधकांवर टीका करत असतात. टीका करतांना अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असतात.
शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखातीत आपण १९९७ मध्ये वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधला आहे. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांची ही मुलाखत व्हायरल झाली. मग वनविभागाला जाग आली. त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायलर झाला आहे. त्यात त्यांनी मिरवणुकीत युवकांना काठीने मारहाण केली आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड युवकांना काठीने मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. संजय गायकवाड त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मारहाण युवकांना हि मारहाण केल्याचे दिसून येत आहे. आमदार गायकवाड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून बुलढाणा शहरातील धक्कादायक घटनेवर पोलिसांकडून काहीच पावले उचलली गेली नाही. यावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा
टेन्शन वाढले…! ‘…तर रावसाहेब दानवेंचा जरांगे पराभव करतील’ भाजप मंत्र्यांच्या दावा