नगर -नगर शहर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी आ. राम शिंदे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, अभय आगरकर, वसंत लोढा, सुवेंद्र गांधी, वैभव लांडगे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भूषण नगर लिंक रोड ते कल्याण रोड 12 कोटी रुपयांचे स्थगिती उठण्याचे आदेश दिले.तसेच मनपाद्दीतील हद्द वाढीतील पंधरा कोटी रुपयांच्या स्थगिती भूषण नगर पाच कोटी इंडस्ट्रियल इस्टेट पाच कोटी व सिव्हिल हडको येथील पाच कोटी या भागातील रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाला दिले.