तळेगाव स्टेशन (वार्ताहर) – शिवजयंती उत्सव हा नाचून साजरा करण्यापेक्षा वाचून साजरा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनात व घराघरात पोहचवावेत. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे. जगात शिवजयंती विचाराने साजरी केली जाते. सध्याचे युवक डीजे लावून जयंती साजरी करतात. शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा हीच खरी शिवजयंती होईल, असे आवाहन शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, संचालक प्रल्हाद जांभुळकर, दत्तात्रय असवले, प्राचार्य अशोक गायकवाड, डॉ.शीतल दुर्गाडे, प्रा.शीतल शिंदे, प्रा.रोहिणी चंदनशिवे, प्रा.योगेश जाधव, प्रा.जया धावारे, प्रा.संतोष शिंदे, प्रा.अशोक कोकाळे, प्रा.सुखदेव जाधव, प्रा.अनिल कोद्रे, अनिता भांबळ, मंगल सस्ते आदी उपस्थित होते.
श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयात बुधवारी (दि.21) शिवजयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिव पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंती उत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर ते महाविद्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.