अवसरी, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांमध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये शिवज्योतीची वाजत गाजत मिरवणूक काढून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तालुक्याच्या पूर्व भागातील तांबडे मळा, अवसरी खुर्द, गावडे वाडी, अवसरी बुद्रुक , टाव्हरे वाडी, येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. मेंगडेवाडी येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती रांगोळी काढण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मेंगडेवाडी कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे, युवा सेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी, उपसरपंच सुजाता मेंगडे, चेअरमन तुकाराम भोर, दत्तात्रय मेंगडे, रंगनाथ गवारी, रेश्मा गवारी, पोपट मेंगडे, भास्कर मेंगडे, संदीप गवारी, अशोक वायाळ, जयसिंग मेंगडे, रुपाली मेंगडे, पोलीस पाटील नितीन मेंगडे, नवनाथ दांगट, दीपक गायकवाड, संजय चक्कर, तेजस मेंगडे, विठ्ठल मेंगडे, पियुष मेंगडे आणि शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.