सातारा – जिल्हा परिषदेच्यावतीने मोठ्या उत्साही वातावरणात किल्ले प्रतापगड येथे शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांचे हस्ते अभिषेक व महापूजा झाली. त्यानंतर भवानी माता मंदिरासमोरील ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी झांजपथक व ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ध्वजारोहण व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सर्व विषय समिती सभापती, पंचायत समिती सभापती व सर्व अधिकारी,विविध जिल्हा परिषद सदस्यांनी पुष्पहार अर्पण केला. उपशिक्षक नितिन मोहिते व प्रकाश कदम यांचे शिवचरित्रावर व्याख्यान सादर केले. तसेच विविध शालेय सांस्कृतिक कार्यक्रम व शाहिरी पोवड्यांचा दिमखदार कार्यक्रमदेखील यावेळी झाला.