वाघोली (पुणे) – लोणीकंद (ता. हवेली) येथील उपसरपंचपदी शितल ज्ञानेश्वर कंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या अगोदरचे उपसरपंच योगेश झुरुंगे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी सरपंच सागर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक घेण्यात आली. यावेळी शितल कंद यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची लोणीकंद गावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी बोरावणे यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित उपसरपंच शितल कंद यांचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी उपसभापती नारायणराव कंद यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच सागर गायकवाड, माजी उपसरपंच संजय कंद, गजानन कंद, रविंद्र कंद, योगेश झुरुंगे, माजी आदर्श सरपंच अनिल होले, श्रीकांत कंद, सोमेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत मोरे, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा पुजाताई कंद, ग्रामपंचायत सदस्य रामदास ढगे, सोहम शिंदे, संतोष लोखंडे, मंदाताई कंद, शैलजा कंद, अश्विनी झुरुंगे, संगीता शिंदे, सुरेखा होले, जयश्री झुरुंगे, पुजा खलसे, आजी माजी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.