हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमधील तब्बल 50 विरोधी लोकप्रतिनिधींना कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या निवडणूकीच्या प्राथमिक टप्प्यात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कार्यक्रम आयोजनासाठी मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अटक केलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये लोकशाहीवादी गटांनी हॉंगकॉंगमध्ये प्राथमिक श्रेनीच्या निवडणूका घेतल्या होत्या. हॉंगकॉंगच्या 70 सदस्यांच्या विधानसभेमध्ये निम्म्यापेक्षा अधिक जागांवर लोकशाहीवादी नेते निवडून आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून या निवडणूकांचे आयोजन केले गेले होते.
हॉंगकॉंगमध्ये गेल्या वर्षी जूनपासून राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे. हॉंगकॉंगच्या विधानसभेवर लोकशाहीवादी गटाचे बहुमत यावे यासाठी शिक्षणतज्ञ बेनी ताय युई तिंग यांनी “35 प्लस’ही रणनिती आखली होती.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार दोषी ठरवलेल्या व्यक्तीला चीनच्या मुख्य भूमीवर नेऊन 3 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे.