शिरूर: शिरूर शहरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी यापुढील काळात नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क परिधान करावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई व साथरोग अधिनियम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
कोरोनाविषाणू 4 राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी व प्रवासात असताना चेहऱ्यावर मास परिधान करणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक स्वच्छता राखणे हे नागरिकांनी आपले कर्तव्य समजावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, पान तंबाखू गुटखा खाऊन थुंकणे करिता मनाई करण्यात आली असून या नियमांचे पालन न केल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
विना मास्क आढळून आल्यास , तसेच सार्वजनिक ठिकाणी पान तंबाखू गुटखा खाऊन थूनकल्यास किंवा नुसते थुंकले तरीही त्यांच्यावर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या दंडाची वसुली शिरुर नगर परिषद क्षेत्रातील संबंधित मुख्य अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत दंडाची वसुली करण्यात येणार आहे.
नागरिकांनी शासनाच्या रस्त्यावर थुंकू नये, मास्क वापरणे या नियमांचे पालन करावे असे आव्हानही शिरूर नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी करून सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस संस्था आणि संघटना विरुद्ध भारतीय साथरोग अधिनियम 1879 भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अन्वय कारवाई करण्यात येणार असेही यावेळी रोकडे यांनी सांगितले. याबाबतचा आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 25 जून पासून दिले आहेत.