शिरूर(प्रतिनिधी)- शहर व पंचक्रोशीत , शिरूर तालुक्याच्या काही भागात काल रात्री आठ च्या दरम्यान वादळीवाऱ्याच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी झाडे व झाडांची फांद्या उन्मळून पडले तर काही फ्लेक्स बोर्डही पडलेअसून, काही भागात शेती मालाचे ही नुकसान झाले आहे. शिरूर जवळील रावसाहेब गायकवाड यांच्या घरासमोर मोठे झाड उन्मळून पडल्याने घराचे थोडेफार नुकसान झाले आहे परंतु कुठली जीवित हानी झाली नाही.
काल दिवसभर वातावरणात मोठ्या प्रमाणात खोकला निर्माण झाला होता परंतु पाऊस येईल असे वाटत नसताना रात्री अचानक आठ च्या दरम्यान आकाशात ढग जमू लागले जोरदार सुसाट वारा सुटला आणि विजेचा कडकडाट ढगांचा आवाज होऊ लागला त्यामुळे नागरिकही भयभीत झाली होती. जोरदार वारा जसा काळी या भागात चक्रीवादळ आलेत काय अशी भीती निर्माण झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात ढगांचा गडगडात व विजेचा कडकडाट होणारा लखलखाट यामुळे अंगावर शहारे आले होते. तर काही ठिकाणी वीज पडल्यासारखे आवाज झाले होते.
शिरूर पंचक्रोशीतील कर्डीलवाडी ,करडे, तर्डोबावाडी, सरदवाडी, अन्नापुर , रामलिंग,टाकळी हाजी, गोलेगा व, निमोणे, या भागातही या पावसाने हजेरी लावली होती परंतु टाकळीहाजी भागातील डाळिंब पिकाला थोडाफार या पावसाचा फटका बसला असून जनावरांचा तारा मका या वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाला होता. शिरूर पंचक्रोशीतील काही भागात थोडेफार तरकारी कांदा व भाजीपाल्याचा नुसकान झाले आहे.
अनेक गावांमध्ये या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती, शिरूर शहरातील पाबल फाट्यावरील लोखंडी फ्लेक्स बोर्ड, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या शिरूर पोलीस स्टेशन रस्त्यावरील शासकीय वासाहती नाका नंबर एक जवळी ल रावसाहेब गायकवाड यांच्या घरावर मोठे झाड तुटून पडले होते परंतु वादळी पाऊस व मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने हे कुटुंब घरातच बसले होते हे मोठे झाड घरासमोर पडल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही, घराच्या अर्धाफुट आत झाड पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.