सोरतापवाडी – शिंदवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या सोसायटीच्या निवडणूकीत शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णा महाडिक गटांची सत्ता आली असुन गेली पंधरा वर्षे सोसायटी ज्यांच्या ताब्यात होती ती आपल्याकडे खेचून आणण्यात अण्णा महाडिक गटाला यश आले आहे. नुकतीच सोसायटीची २०२२ ची निवडणूक झाली . विरोधी गटाने आण्णा महाडिक यांना पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडुन अतिशय जबर व्युहरचना आखली होती. ती व्युहरचना भेदून काढण्यात आण्णा महाडिक गट यशस्वी झाला असल्याची चर्चा हवेली तालुक्यात सुरू असुन या विजयाने आण्णा महाडिक यांनी सहकारात दमदार प्रवेश केल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत विरोधी गटाकडे गेली १५ वर्षे असलेली सत्ता अतिशय चुरशीची लढत देत आण्णा महाडिक गटाने १२-१ असा दणदणीत विजय मिळवत विरोधी गटाकडून खेचून आणली . आण्णा महाडिक गटाचा पराभव करण्यासाठी विरोधी गटाला शेजारील गावातील पुढाऱ्यांनी सर्व रसद पुरविण्यात आली असल्याची चर्चा पुर्व हवेलीतील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. एवढी मोठी रसद पुरवुन सुद्धा आण्णा महाडिक गटाचा दणदणीत विजय झाल्यामुळे शिंदवणे परिसरात आंनदाचे वातावरण आहे.
श्री संत यादव बाबा कृषी विकास पॅनलचे विजयी उमेदवार
बबन गणपत खेडेकर ,कांतीलाल चंद्रकांत महाडिक , युवराज सर्जेराव महाडिक, पोपट विठ्ठल महाडिक, राजाराम परसराम महाडिक, सचिन जालिंदर महाडिक ,आनंद सोपान शितोळे , वंदना संभाजी महाडिक , मिराबाई अशोक यादव ,कुमार दत्तात्रय धारक , बापू नामदेव शिंदे , छबुबाई बापु कांबळे .