मुंबई – बॉलिवूड स्टार हेमा मालिनी एका सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहेत. त्यामुळे सध्या हेमा मालिनी चर्चेत आल्या आहेत. शिमला मिरची असं या सिनेमाचं नाव आहे.
या सिनेमात हेमा मालिनी त्यांच्याहून निम्म्या वयानं लहान असणाऱ्या अभिनेत्यासोबत रोमँस करताना दिसणार आहे. 71 वर्षीय हेमा मालिनी आणि 35 वर्षीय अभिनेत्याची केमिस्ट्री सिनेमात पहायला मिळणार आहे.
नुकताच शिमला मिरची सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला आहे. चाहत्यांचाही ट्रेलरला चांगला प्रतिसाद आहे. या सिनेमात रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. हेमा मालिनी ज्याच्यासोबत रोमँस करताना दिसणार आहे त्याचं नाव आहे राजकुमार राव. प्रेमाचा त्रिकुट या सिनेमात पहायला मिळणार आहे. राजकुमार रकुलच्या प्रेमात पडतो आणि रकुलची आई म्हणजेच हेमा मालिनी एका पत्राच्या गैरसमजातून राजकुमारच्या प्रेमात पडतात अशी काहीशी सिनेमाची स्टोरी आहे. रमेश सिप्पी हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत.