मुंबई – फिटनेस फ्रिक असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या मोठ्या स्क्रिनपासून दूर असली तरी ती मोठं मोठ्या इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसते. अशाच एका इव्हेंटमध्ये शिल्पा शेट्टीने हजेरी लावली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. शिल्पा यावेळी थेट व्हील चेअरवर बसून कार्यक्रमाला आली कारण तिच्या पायाला इंज्युरी झाली होती.
आपल्या कामाप्रती डेडिकेशन दाखवत शिल्पा शेट्टीने इंज्युरी होऊनही कार्यक्रमाला हजेरी लावली यामुळे तीच अनेकांनी कौतुक देखील केलं. शिल्पाने स्वतः हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. इंज्युरी असूनही शिल्पा त्याच उत्सहात आणि आनंदात कॅमेऱ्याला सामोरी गेली आणि आपल्या स्टायलिश अदांनी सर्वांना घायाळ देखील केलं.
View this post on Instagram
अनेकांनी शिल्पाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटादरम्यान शिल्पाला ही दुखापत झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासुर्वी शिल्पाने स्वतः प्लास्टरमधील आपल्या पायाचा फोटो शेअर केला होता. ‘इंडियन पोलीस फोर्स’ या रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात शिल्पा शेट्टी दिसणार आहे.