मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली ‘शेवंता’चं खर नाव अपूर्व नेमळेकर आहे. अपूर्व रोज रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येते.
गेले तीन ते साडेतीन महिन्यांपासून सर्व मालिकांचे आणि चित्रपटांचे शूटिंग बंद ठेवण्यात आले होते. आत अनलॉक 1 च्या टप्प्यात हळूहळू चित्रिकरणास सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या दिवसात अपूर्वा आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाद्वारे संवाद साधत आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत.सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते.
View this post on Instagram
नुकतंच अपूर्वाने इंस्टाग्रामवर आपल्या फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत सांगितले कि,’आणि शेवटी माझे पायजामाचे दिवस संपले !!!पुन्हा कामावर परत येण्याची वेळ आली आहे .. माझ्या प्रिय शेवान्त लवकरच भेटू … ‘ या फोटोला सोशल मीडियावर चांगलाच फॅन्स कडून कंमेंट्स होत असून एका चाहत्याने या फोटोवर खुप मिस करतोय शेवंता … कधी एकदा रोज रात्रीस खेळ चाले बघतोय ऐसे झलाय. असेही म्हणले आहे.