एकूण रुग्णसंख्या १३७२ तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आणखी ११ जणांना करोनाची बाधा झाली आहे. दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३७२ झाली आहे. तर करोनामुळे ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत बाधितांमधील निकट सहवासातील २, प्रवास करुन आलेले ३, सारीचे ५ व आरोग्य कर्मचारी १ अशा एकूण ११ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच माण तालुक्यातील कन्नडवाडी व सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या ११ जणांमध्ये सातारा तालुक्यातील फडतरवाडी येथील २३ वर्षीय पुरुष, धनगरवाडी, कोडोली येथील ४८ वर्षीय पुरुष, करंडी येथील ५९ वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ४२ वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी, जावळी तालुक्यतील कुसुंबी येथील ३५ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील सुभाषनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील ४२ वर्षीय पुरुष, शिरवळ येथील ६० वर्षीय पुरुष, पारगाव येथील ५० वर्षीय पुरुष, फलटण येथील ३४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रात्री उशिरा कन्नडवाडी (ता. माण) येथील ७५ वर्षीय पुरुष व जिहे (ता. सातारा) येथील ५८ वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
घेतलेले एकुण नमुने : १५,२५३
एकूण बाधित : १३७२
घरी सोडण्यात आलेले : ८१३
मृत्यू : ५७
उपचारार्थ रुग्ण : ५०२