मांडवगण फराटा – वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील विरेंद्र शेलार यांची शिरूर विधानसभा मतदार संघाच्या संघटकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे सोपवली.
शिवसेना पक्षवाढीसाठी विरेंद्र शेलार यांना शिरूरच्या पूर्व भागातून शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष माऊली कटके व तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले.