नाशिक – नाशिक जिल्ह्यातील ओझर येथून वेदनादायी घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पूर्वा नितीन पगारे असे या तरुणीचे नाव आहे. 18 मार्च रोजी पुर्वाने हे टोकाचे पाऊन उचलले आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 मार्चला तिचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवशीच पुर्वावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्या कुटूंबीयावर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुर्वाच्या काकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसात लेखी निवेदन दिले आहे. घटनास्थळावरून तिचा मोबाईल गहाळ असल्याने त्यांना संशय बळावल्याने त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात सदर प्रकार हा आत्महत्येचा नसून खूनाचा असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यात यावा या आशयाचे निवेदन दिले. पुढील तपास ओझर पोलीस करत आहेत.