Vijay Hazare Trophy 2021 : पडीक्‍कलचे दीडशतक, कर्नाटकचा विजय

अलुर – कर्नाटकचा धडाकेबाद फलंदाज देवदत्त पडीक्कलने तुफानी फटकेबाजी करत दीडशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने ओडिशा संघाचा 101 धावांनी पराभव करत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने पडीक्कलच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर 5 बाद 329 असा धावांचा डोंगर उभा केला. पडीक्कलने आपल्या 152 धावांच्या वादळी खेळीत 140 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार व 5 षटकार अशी आतषबाजी केली.

या धावांचा पाठलाग करताना ओडीशाचा डाव 44 षटकांत 228 धावांवर संपला व कर्नाटकने 101 धावांनी हा सामना जिंकला. सुभ्रान्शू सेनापतीच्या 78 तर, अंकित यादवच्या 56 धावांच्या खेळीनंतरही त्यांना पराभव पत्करावा लागला. कर्नाटककडून प्रसिध कृष्णा व श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.