Shashi Tharoor Actor Shobhana Loksabha 2024 – भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठी केरळमधील उमेदवारांच्या यादीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत केली जाणार असून यातील सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या विरोधात अभिनेत्री शोभना यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्रन यांच्या राज्यातील पदयात्रेचा २७ तारखेला समारोप होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहे. याचवेळी उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. तिरूअनंतपूरम हा थरूर यांचा बालेकिल्ला झाला आहे.
या मतदारसंघात त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्याचा भाजपचा विचार असून त्याकरता शोभना, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि निर्माता-अभिनेता सुरेश कुमार यांच्या नावांचा विचार केला जातो आहे. | Shashi Tharoor Actor Shobhana
पहिल्या यादीत तिरूअनंतपूरम, अटिंगल, कोल्लम, पथानामथिट्टा, पलक्कड, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोट्टायम, चालक्कुडी येथील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. पथानामथिट्टा जागेसाठी पी. सी. जॉर्ज आणि त्यांचे पुत्र शोन जॉर्ज यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याखेरीज गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे नावाही केंद्रीय नेतृत्वाला सूचविण्यात आले आहे. | Shashi Tharoor Actor Shobhana
यावर्षी मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक संसदेत संमत केल्यानंतर शोभना यांनी सरकारचे कौतुक केले होते. तेंव्हापासून भाजपच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, देशपातळीवर जरी इंडिया आघाडी स्थापन झाली असली तरी केरळमध्ये डाव्या पक्षांची स्थिती भक्कम आहे.त्यामुळे हे पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. | Shashi Tharoor Actor Shobhana