जबाब नोंदवून प्राथमिक चौकशी : पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता
पुणे – पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल उस्मानी याने बुधवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदवून प्राथमिक चौकशी केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.
उस्मानी ज्या दिवशी पोलीस ठाण्यात आला त्यावेळी पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली. रात्री उशीरापर्यंत याबाबत माध्यमांनादेखील सुगावा लागला नाही.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या एल्गार 2021 या परिषदेत हिंदू धर्माविषयी प्रक्षोभक भाषण केले होते. त्यावरून भाजपने याच विषयावर आंदोलने करून उस्मानीच्या अटकेची मागणी केली होती.
भावना भडकावल्याप्रकरणी (भादंवि कलम 153 ए) शरजिलवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. याबाबत भारतीय युवा जनता मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे (28, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांच्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटले होते.