नवी दिल्ली – स्टेट बॅंकेसह विविध बॅंकांनी येस बॅंकेत गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहींर केल्यानंतर तसेच केंद्र सरकारने या बॅंकेच्या पुनर्ररचनेच्या योजनेला मंजुरी दिल्यानंतर या बॅंकेच्या शेअर्सच्या भावात अचानक मोठी वाढ आज नोंदवली गेली. आजच्या व्यवहारात एकूण 58 टक्क्यांनी हे शेअर्स वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजारात या बॅंकेच्या शेअरचा भाव आज 40 रूपये 40 पैसे इतका नोंदवला गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही याचा दर तितकाच राहिला. मुंबई शेअर बाजारात आज या बॅंकेचे एकूण 112 .78 लाख शेअर्स विकले गेले. बुडित कर्जाचे प्रमाण वाढल्यामुळे येस बॅंक गाळात गेली होती व त्या बॅंकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लागू केले होते. त्यामुळे या बॅंकेचे शेअर्स गडगडले होते.