Share Market Today| आज गुरुवारी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह 73600 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टीनेही 200 अंकांची उसळी घेत 22300 चा टप्पा पार केला आहे. बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे. याआधी बुधवारी सेन्सेक्स 526 अंकांनी वाढून 72,996 वर बंद झाला होता.
आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरत आहेत. आज कंपनी NSE वर 2.15 किंवा 2.76 टक्क्यांच्या घसरणीसह 75.65 रुपयांवर व्यवहार करत आहे. सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, हाय-टेक पाईप्स आणि सोना बीएलडब्ल्यू यासह अनेक कंपन्यांचे शेअर्स आज (गुरुवार) 28 मार्च रोजी फोकसमध्ये असतील.
तर सुरुवातीच्या व्यवहारात विप्रो, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, स्टेट बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टाटा स्टील यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज पुन्हा तेजीसह उघडले. बजाज ऑटो, टायटन कंपनी आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही सुरुवातीला वाढ झाली.
अमेरिकी बाजार
यूएस मार्केट टेक-हेवी नॅस्डॅक कंपोझिट 83.82 अंकांनी किंवा 0.51% वाढून 16,399.52 वर बंद झाला. S&P 500 44.91 अंकांनी, किंवा 0.86% ने वाढून 5,248.49 वर, तर Dow Jones Industrial Average 477.75 अंकांनी, किंवा 1.22% ने वाढून 39,760.08 वर पोहोचला.
बुधवारी कशी होती स्थिती?
काल 30 शेअर्सवर आधारित सेन्सेक्स 526.01 अंकांच्या किंवा 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 72,996. 31 अंकांवर बंद झाला. तर 50 शेअर्सवर आधारित नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 118.95 अंकांच्या किंवा 0.54 टक्क्यांच्या वाढीसह 22,123.65 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) भांडवली बाजारात निव्वळ खरेदीदार होते. त्यांनी बुधवारी 2,170.32 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदी केली.