Nitin Gadkari । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात भाजपकडून नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुधवारी २७ मार्चला त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मिळलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरतांना निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. ज्यात मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Nitin Gadkari । प्रतिज्ञापत्रात ऐकून किती संपत्ती
– शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून एकूण 15.52 कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
-एकूण कर्जाची रक्कमदेखील वाढली आहे. 2019 साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे मिळून 10 कोटी 27 लाख 34 हजार 854 रुपयांची संपत्ती होती. तर 2024 मध्ये हा आकडा 15 कोटी 52 लाख 60 हजार 46 इतका झाला.
शपथपत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, गडकरी व त्यांच्या पत्नीकडे 2019 साली 1 कोटी 61 लाख 37 हजार 851 रुपयांची चल संपत्ती होती. 2024 मध्ये हा आकडा 2 कोटी 57 लाख 77 हजार 46 इतका झाला आहे. यात 27 हजार 50 रुपयांची रोकड, 65 लाख 10 हजार 300 रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, 38 लाख 50 हजार 396 हजार रुपयांची गुंतवणूक, 45 लाख 94 हजार 843 रुपयांची वाहने तर 56 लाख 1 हजार 757 रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
हे वाचाल का ? नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडू संतापले; जाहीर केली भूमिका