A. Ganeshamurthi Died| लोकसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्याने तामिळनाडूतील एका खासदाराने टोकाचे पाऊल उचलले आहे. तामिळनाडूतील इरोड येथील एमडीएमकेचे विद्यमान खासदार ए. गणेशमूर्ती यांना निवडणुकीत तिकीट न मिळाल्याच्या रागातून त्यांनी रविवारी 24 मार्च रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी (28 मार्च 2024) त्यांचे निधन झाले.त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं म्हटले आहे. गणेशमूर्ती हे 2019 मध्ये इरोडे या मतदारसंघामधून निवडून आले होते. मात्र, यंदा त्यांना पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे ते निराश होते, अशी चर्चा होती. यामुळे ते तणावात होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. उपचार सुरू असतानाच खासदार गणेशमूर्ती यांचे निधन झाल्याने तामिळनाडूत राजकीय पक्षांच्या नेत्यांना धक्का बसला आहे.
नेमकं काय घडले? A. Ganeshamurthi Died|
गणेशमूर्ती यांनी 24 मार्च रोजी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उलट्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी खासदार गणेशमूर्तींना रुग्णालयात दाखल केले. गणेशमूर्ती यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दिली.
खासदार गणेशमूर्ती यांना रुग्णालयात तपासानंतर आयसीयूमध्ये दाखल केलं होतं. तर त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. पुढे त्यांना कोईम्बतूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
गणेशमूर्तींच्या जागी कोणाला संधी? A. Ganeshamurthi Died|
गणेशमूर्ती यांनी एमडीएमके पक्षातील अनेक पदे भूषवली होती. तीन वेळा संसदेत ते निवडून गेले आहेत. परंतु यावेळी मतदारसंघात डीएमके पक्षाने उमेदवार उभा केला तर तिरुचिमधील जागा एमडीएमके यांना देऊ केली. एमडीएमके पक्षाचे महासचिव वाइको यांचा मुलगा दुरई वाइको यांना उमेदवारी जाहीर केली.
तर गणेशमूर्तींच्या जागी डीएमके आघाडीने इरोडमधून युवा नेते के ई प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या जवळचे मानले जातात.
हेही वाचा:
ग्राहकांनो आज तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं ‘सोनं – चांदी’