BSE and NSE Closing Wednesday: आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या चढ-उतारानंतर हिरव्या चिन्हावर बंद झाले. आज रात्री फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. दरम्यान, जागतिक बाजारात कमजोर कल दिसून आला.
आजच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 90 अंकांनी वधारला. त्याच वेळी, निफ्टीमध्येही 22 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. व्यापक बाजारपेठांमध्ये, बीएसई मिडकॅप 0.05 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.14 टक्क्यांनी घसरला.
बीएसईचा 30 शेअर्सचा मानक निर्देशांक सेन्सेक्स 89.64 अंकांच्या किंवा 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 72,101.69 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने आज 71,674.42 आणि 72,402.67 च्या रेंजमध्ये व्यवहार केला.
दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या निफ्टीनेही 21.65 अंकांची म्हणजेच 0.1 टक्क्यांची वाढ नोंदवली. निफ्टीने दिवसाचा शेवट 21,839.10 अंकांवर केला. निफ्टीने आज 21,710.20 आणि 21,930.90 च्या रेंजमध्ये व्यवहार केले.
टॉप गेनर्स –
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी मारुती सुझुकी 2.97 %, पाॅवर ग्रीड 2.16 %, नेस्ले इंडिया 2.09%, एसबीआय 1.83%, आयटीसी 1.55% वाढीसह बंद झाले. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स या समभागांमध्येही आज तेजी होती.
टॉप लूजर्स –
दुसरीकडे, टाटा स्टील 1.98%, टाटा मोटर्स 1.76%, ॲक्सिस बँक 1.53 %, एचडीएफसी बँक 1.23%, एचयूएल 1.21 % घसरणीसह बंद झाले. तसेच जेएसडब्ल्यू स्टील आणि एचसीएल टेक या समभागांमध्येही घसरण झाली.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सची स्थिती –
काल शेअर बाजार कोसळला होता –
मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. निर्देशांकात मोठे वजन असलेल्या TCS, Infosys आणि Reliance Industries सारख्या समभागांच्या घसरणीसह बाजार बंद झाला होता.
काल लाल रंगात उघडल्यानंतर बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स 736.37 अंकांनी किंवा 1.01 टक्क्यांनी घसरून 72,012.05 वर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी-50 देखील 238.25 अंकांच्या किंवा 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 21,817.45 च्या पातळीवर बंद झाला होता.