मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देत, “मी भाजपाचा पुन्हा राज्यात सत्तेत येऊ देणार नाही”, असा निर्धार केला. या मुद्द्यावरून आता भाजपने पवारांना उत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे. “तुमच्या पक्षाचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवा”, अशा शब्दांत भाजपाने शरद पवारांना खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
गुरुवारी रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पवारांनी पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. “भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही”, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.
आदरणीय @PawarSpeaks साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा.
इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात.
55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2022
दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर भाजपाकडून प्रत्युत्तर देत खोचक शब्दात टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये “आदरणीय शरद पवार साहेब..कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला १०५ जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल”, अशा शब्दांत शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा.
इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात.
55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2022
तसेच “शरद पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षांत दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”, असं आव्हान भाजपानं शरद पवारांना दिलं आहे. यावेळी आपने पंजाबमध्ये मिळवलेल्या विजयावरून देखील भाजपाने शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजपाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांना राज्यातील तीन प्रलंबित प्रश्नांबाबत देखील विचारणा करण्यात आली आहे. “आदरणीय शरद पवारजी, भाजपाला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. राज्यात एसटी बंद, ६ महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभ्या उभ्या करपून जात आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण.. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा”, असे भाजपाच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.