मथुरा – होळी हा सण आहे मौजमजेचा आणि बागडण्याचा. वसंत ऋतूच्या सौंदर्याची नांदी होळीच्या सणातून वाजू लागते. भारतात होळी साजरी केली जाते रंगांच्या माध्यमातून. एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्याची पद्धत भारताच्या अनेक भागांत आहे. मात्र, वृंदावनची होळी संपूर्ण देशात आकर्षणाचा विषय असतो. वृंदावन मध्ये होळीनिमित्त चौफेर रंगांची उधळण केली जाते.
आज सुद्धा मथुरेच्या वृंदावनमध्ये होळीचा उत्सव मोठा उत्साहात आणि आनंदाने साजरा होत आहे. होळीचा उत्साह शिगेला पोहचला असून, संपूर्ण वृंदावन मध्ये रंगाची उधळण होत असल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांनी आज होळीसाठी वृंदावन मधील बांके बिहारी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.
#WATCH | Uttar Pradesh: #Holi celebrations underway at Banke Bihari Temple in Vrindavan of Mathura district. pic.twitter.com/DxFOZncA9F
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 18, 2022
गेले दोन वर्ष देशावर करोनाचे सावट होते. मात्र, आता करोनाचे संकट कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. वृंदावन मधील होळीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. दरम्यान, वृंदावन प्रमाणेच देशातील सर्वच राज्यांमध्ये होळीचा मोठा जोश पाहायला मिळत आहे.