Sharad Pawar On Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार असा सामना होणार असलत्याचं जवळ जवळ निश्चित मानलं जात आहे. अशात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर टीका करत बारामतीतून लोकसभेसाठी आपण देखील मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशात खासदार शरद पवार यांनी शिवतारेंच्या या भूमिकेवर भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यापूर्वी असलेला संघर्ष आणि एकूणच पवार कुटुंबाविरोधात शिवतारे यांचं राजकारण राहिलेलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघ हा कोणाचा सातबारा नाही, देशातील ५४३ पैकी एक मतदारसंघ आहे. येथे मालकी कोणाची नाही. म्हणून पवार-पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभीमान जागा करून लढलं पाहिजे आणि जनतेला पवारांव्यतिरिक्त पर्याय दिला पाहिजे असं म्हणत शिवतारे यांनी आपणही बारामती लोकसभेत उतरणार असलयाचे म्हंटले होते. शिवतारेंच्या या भूमिकेवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. | Sharad Pawar On Vijay Shivtare
विजय शिवतारे यांनी आता निर्णय घेतला आहे. मात्र शिवतारे यांचे कार्यकर्ते आणि मतदार हा महाविकास आघाडीचा नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. तसेच आता याचा फायदा कोणाला होईल हे पाहूया. शिवतारे शेवटपर्यंत लढणार आहेत का हेसुद्धा पाहुया असं देखील पवार यावेळी म्हणाले. | Sharad Pawar On Vijay Shivtare
काय म्हणाले होते शिवतारे नेमकं ?
शिवतारे म्हणाले,”बारामतीत लोक म्हणत आहेत अजित पवार उर्मट आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाहीत सुप्रीय सुळेंना मतदान करू. त्यावेळी मी ठरवलं की, बारामतीत सहा लाख ८६ हजार मतदान पवारांच्या समर्थनात आहे, पण ५ लाख ५० हजार मतदार पवार विरोधक आहेत. मग त्यांना अशा नाआवडत्या लोकांना मतदान न करण्याची संधी मिळाली नाही तर तो लोकशाहीचा घात होतोय हे लक्षात आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं. असं शिवतारे यांनी यावेळी स्पष्ट केलं. | Sharad Pawar On Vijay Shivtare
अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदललं ! आता ‘या’ नावाने ओळखलं जाणार शहर.. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
“कोणाचेही नागरिकत्त्व जाणार नाही ! CAA बाबत विरोधक..” भाजप नेत्याने स्पष्टचं सांगितलं