मुंबई – सर्वांचे मनोरंजन करणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा यंदाचा सीझन 16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो आहे. तसेच, गेल्या 12 वर्षांपासून सलमान खानने ह्या शो चे होस्टिंग केले असून, शो यशस्वी करण्यात सलमान खानची महत्वाची भूमिका आहे. ‘बिग बॉस’चे वैशिष्टय़ म्हणजे हा रिएलिटी शो देशातील सर्वात मनोरंजक आणि प्रसिद्ध चेहऱ्यांना एका छताखाली आणण्यासाठी ओळखला जातो.
हा शो ‘बिग मनी गेम’ आहे यात काही शंका नाही. भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण या शो मध्ये पाहायला मिळत. दरम्यान, यंदाच्या ‘बिग बॉस-16’ मधील दोन स्पर्धकांनी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘टीना आणि शालीन’ यांच्या नात्याने सर्वांना गोंधळात पाडलं आहे.
हे दोघे अनेकदा भांडताना दिसतात. पण जोरदार भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र आल्याने स्पर्धकांना आणि चाहत्यांना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. नुकतंच, बिग बॉसच्या घरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बिग बॉसचा स्पर्धक ‘एम. सी स्टॅन’ने त्याच्या बँडसह लाईव्ह सादरीकरण केलं होतं. एम. सी स्टॅनच्या शोसाठी चाहते आणि स्पर्धक दोघे उत्सुक होते.
पण सर्वांचं लक्ष ‘टीना आणि शालिन’ने वेधलं होते. एम. सी स्टॅनचा शो सुरु असताना टीना आणि शालिन सर्वांसमोर इंटिमेट झाल्याचं दिसून आलं. यावेळी हे दोघे एकमेकांच्या पूर्ण प्रेमात बुडून आपला डान्स एन्जॉय करताना दिसले. यावरून एम. सी स्टॅनने दोघांची खिल्ली देखील उडवली, पण त्याचा दोघांना काहीही फरक पडला नाही.
दरम्यान लाईव्ह शोमध्ये टीना-शालिन इंटिमेट झाल्यामुळे बिग बॉसला मध्येच शो थांबवावा लागला होता. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट देखील येत असून, त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.