कोलकाता – कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आता सुरूवात झाली आहे. या महोत्सवाचे यंदा 25 वे वर्ष आहे. नुकताच या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. शुक्रवारी कोलाकातामध्ये या महोत्सवाचे उद्धाटन अभिनेता शाहरूख खानच्या हस्ते करण्यात आले. कोलकाता येथील नेताजी इंडोर स्टेडियममध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा ‘सिटी ऑफ जॉय’ चा ब्रँड अँबेसडर आहे. त्यामुळे या सोहळ्यात त्याची विशेष उपस्थिती होती.
यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रीडा, राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती. किंग खानसोबतच ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार, महेश भट्ट, कुमार शाहनी, सौरभ गांगुली, श्रीजीत मुखर्जी, मिमी चक्रवर्ती, नुसरत जहां, सोहम चक्रवर्ती, परमब्रत चॅटर्जी, जीशु सेनगुप्ता, इंद्राणी हलधर यांचीही उपस्थिती विशेष ठरली.
दरम्यान, या कार्यक्रमाचे उद्घाटन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते केले जाणार होते. मात्र, काही कारणास्तव ते या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. यावेळी संसदेच्या खासदार नुसरत जहाॅं यांनी शाहरुखला स्मृती ट्रॉफी प्रदान केली. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आठ दिवस सुरू राहणार आहे. यामध्ये 76 देशातील 214 सुविधा आणि 152 शॉट्स आणि वृत्तचित्रांचा एक गुलदस्ता सादर करण्यात येणार आहेत.