अयोध्या निकाल : पिंपरी पोलीस आयुक्तांनी केली सुरक्षेची पाहणी

पिंपरी – अयोध्येच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर अयोध्येतच पर्यायी 5 एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी पोलीस सतर्क असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करून बंदोबस्ताची योग्य आखणी केली आहे. तसेच पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनीही स्वतः बंदोबस्ताची पाहणी केली होती.

नागरिकांनी सोशल मीडियावर आफवा पसरविणारे संदेश पुढे पाठवू नये. सोशल मीडियावर असे संदेश पाठविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर टाकू नये. तसेच, धार्मिक भावना दुखावतील, असा जल्लोष व फटाके वाजवू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.