गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेला इम्रान हास्ग्मी सध्या “बार्ड ऑफ ब्लड’ या त्याच्या आगामी वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये त्याने शाहरुख खानला डब्बा आणि ढक्कन असे म्हटले होते. या वक्तव्यांबाबत इम्रान हाश्मीने शाहरुखची माफी मागितली आहे.
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान इम्रानच्या “बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसीरीजचा निर्माता आहे. तसेच या वेबसीरीजमध्ये शाहरुख पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. या वेबसीरीजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख इम्रानची खिल्ली उडवताना दिसत आहे. या खिल्लीवर प्रतिक्रीया देताना इम्रानने शाहरुखला डब्बा आणि ढक्कन असे म्हटले. परंतु या वक्तव्याबाबत त्याने शाहरुख खानची मालिकेच्या प्रमोशनदरम्यान जाहिर माफी मागितली.
बार्ड ऑफ ब्लड’ ही सिरीज लेखक बिलाल सिद्दिकी यांच्या “बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. ही सिरीज येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सिरीज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रान हाश्मी, शोभिता धुलिपाला, कीर्ति कुल्हारी, विनीत सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत. दरम्यान, नेटफ्लिक्सवरील “बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसिरीजमधून इम्रान पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करणार आहे. या सिरीजची निर्मिती शाहरुख खान करत आहे.