शाहरुख खानला शेकडो फॅन्सचे प्रेम मिळाले आहे. तरिही त्याने आपल्यातील सौजन्य जराही कमी होऊ दिलेले नाही. ऍसिड हल्ल्यात जखमी झालेली त्याची एक फॅन अनुपमाच्या लग्नाच्या निमित्ताने शाहरुखने तिला खास प्रेमपूर्वक शुभेच्छा पाठवल्या आहेत.
अनुपमा आणि जगदीप सिंह या जोडीला शाहरुखने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखनेच स्थापन केलेल्या “मीर फौंडेशन’च्या माध्यमातून अनुपमा आणि जगदीप सिंह यांचा विवाह निश्चित करण्यात आला आहे. “अनुपमा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करते आहे.
त्याबद्दल माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत. तुझे आयुष्य प्रेम आणि हास्याने भरून जाऊ दे. जगदीप तू खरा पुरुष आहेस. तुम्ही दोघांनी मिळून आपल्या जीवनातील आनंद द्विगुणित करावा.’ अशी शुभेच्छा शाहरुखने या निमित्ताने दिल्या आहेत.
शाहरुखचा अलिकडचा “झिरो’ बॉक्स ऑफिसवर आपटला होता. याशिवाय नेटफ्लिक्सवरच्या “माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इन्ट्रोडक्शन विथ डेव्हिड लेटरमॅन’मध्येही त्याने हजेरी लावली होती. त्यामध्ये त्याने आपल्या आयुष्यातील काही अनुभव सांगितले होते. आपल्या मुलांसाठी इटालियन खाद्यपदार्थ बनवायला शिकत असल्याचेही त्याने सांगितले होते.