नवी दिल्ली – देशभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशातच सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं चित्र पाहायला मिळतिये. याच पार्श्वभूमीवर आता देशाचे गृहमंत्री अमित शाह दिल्लीतील कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.
ही बैठक देशाचे आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल, एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. याबाबतची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली असून ही बैठक उद्या सकाळी ११ वाजता गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात पार पडेल.
Dr Randeep Guleria, Director of All India Institute of Medical Sciences (AIIMS) and other senior officers would also be present: Office of the Home Minister https://t.co/F7R2RcZGeR
— ANI (@ANI) June 13, 2020