नवी दिल्ली – छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान पत्नीच्या इच्छेविरोधात ठेवलेले शारीरिक संबंध अत्याचार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. महिलेने आपल्या पतीवर अत्याच्याराची आणि अनैसर्गिक पद्धतीनं संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
कायदेशीररित्या विवाहित पत्नीसोबत तिच्या इच्छेविरोधात किंवा बळजबरीने संबंध ठेवणे म्हणजे अत्याचार नसल्याचे म्हटले आहे. वकील वाय सी शर्मा यांनी सांगितले आहे.
जून २०१७ रोजी लग्न झालेल्या या जोडप्याचे लग्नानंतर काही दिवसांतच वाद होण्यास सुरुवात झाली. यावेळी सासरच्याकडून हुंड्याची मागणी करत तिचा छळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पतीने तिच्या इच्छेविरोधात आणि अनैसर्गिकरित्या शारीरिक संबंधही ठेवले व तिला शिवागाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर पती व त्याच्या कुटुंबातील सदस्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच न्यायालयाने आरोपीचे ठरविले होते.