IPL 2024 (Live Cricket Score PBKS vs GT) : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुल्लापूर येथे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
एका बाजूला सलग 3 सामने हरल्यानंतर पुढे आलेला पंजाब आहे, तर दुसऱ्या बाजूला शेवटचा सामना गमावल्यानंतर येणारा गुजरातचा संघ आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आता विजयी मार्गावर परतायचे आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवन अजूनही तंदुरुस्त नसून तो आजच्या सामन्यात पुनरागमन करणार नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सॅम करन संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा बाजूनं लागला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Punjab won the toss against Gujarat, chose to bat) आता टाॅस हरल्यानंतर गुजरात टायटन्सचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेल. या सामन्यात पंजाब कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्सने एका बदलासह प्रवेश केला आहे. अजमतुल्ला उमरझाईचे संघात पुनरागमन झाले आहे. स्पेन्सर जॉन्सनच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.
🚨 Toss Update from Mullanpur 🚨
Punjab Kings win the toss and elect to bat against Gujarat Titans.
Follow the Match ▶️ https://t.co/avVO2pCwJO#TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/BbeeC23H4C
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
PBKS vs GT Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.
इम्पॅक्ट सब : साई सुदर्शन, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर.
पंजाब किंग्ज : सॅम कुरान (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिले रौसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट सब : राहुल चहर, विद्वथ कवेरप्पा, अथर्व तायडे, हरप्रीत सिंग भाटिया, शिवम सिंग.
दरम्यान, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना महाराजा यादविंदर सिंग स्टेडियम, चंदीगड येथे होणार आहे. या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर येथे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजापेक्षा वेगवान गोलंदाजाची ताकद अधिक दिसते.