डेहराडून :- उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात रविवारी गुजरातमधून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू, तर 27 जण जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना गंगोत्रीहून परतत असताना गंगनानी येथे घडली. या बसमधून 35 जण प्रवास करत होते. या अपघाताची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचार्व कार्य सुरू केले.
या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना मदत आणि बचाव कार्य जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे.