सांगली -सांगली जिल्ह्यात शुक्रवारी आणखी सात जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या 279 इतकी झाली आहे. यापैकी 104 जणांवर मिरज करोना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, शुक्रवारी 13 जणांनी करोनावर मात केली आहे.
शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आंधळी ता. पलूस येथील 45 वर्षीय पुरुष, निगडी ता. शिराळा येथील 32 वर्षाची महिला, अमरापूर ता. कडेगाव येथील 68 वर्षीय महिला आणि मणदूर ता. शिराळा येथील 37 वर्षीय पुरुष, 33 वर्षाची महिला, 27 वर्षाची महिला आणि 8 वर्षाचा मुलगा अशा सात जणांचा समावेश आहे. निंबवडे ता. आटपाडी येथील 58 वर्षीय पुरुष, मणदूर ता. शिराळा येथील 4 जण, विटा ता. खानापूर येथील 67 वर्षाचा पुरुष, विठ्ठलापूर ता. आटपाडी येथील 96 वर्षीय महिला, पलूस येथील सहा व्यक्ती अशा 13 जणांनी करोनावर मात केली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 166 जणांनी करोनावर मात केली आहे.