लंडन – जगातील सर्वच देश चीनकडे नेहमी संशयाच्या नजरेतून बघत असतात आता ब्रिटन आणि अमेरिकेच्या हेरखात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये चीनने आपल्या हेरगिरीमध्ये तब्बल सात पट वाढ केली आहे पारंपारिक पद्धतीने हेरगिरी करत असतानाच चीनने आता हेरगिरीसाठी हॅकिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासही सुरुवात केली आहे.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा असलेल्या एफबीआयचे निर्देशक क्रिस्तोफर रे आणि ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा असलेल्या एम आय फाईव्हचे संचालक केन मॅकलम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चीनच्या या कारवायांकडे लक्ष वेधले आहे या चार वर्षांच्या कालावधीमध्ये चीनमधील हॅकर्सनी अमेरिकेत तब्बल सात हजार वेळा हल्ले केले.
आणि काही महत्वाची माहिती चोरली अशीही माहिती यावेळी देण्यात आली करोना महामारी काळामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान चोरण्यासाठी चीनमधून पाच हजार वेळा सायबर हल्ले झाल्याची माहिती ब्रिटिश गुप्तचरांनी दिली आहे चीनला यासाठी रशिया बेलारूस सिरिया उत्तर कोरिया या देशांचाही पाठिंबा मिळत असल्याची माहिती ब्रिटन आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
दिलेल्या माहितीनुसार चीनमधील कम्युनिस्ट सरकारने तब्बल दहा हजार हॅकर चा एक सायबर सेल तयार केला असून जगातील विविध देशांवर सायबर हल्ला करण्याचे काम या सेलला देण्यात आले आहे हे दहा हजार हॅकर केवळ दाखवण्यासाठी चीनमधील अनेक कंपन्यांमध्ये काम करत असले तरी त्यांचे प्रत्यक्ष काम वेगळेच असून या हेरगिरीच्या कामासाठी त्यांना वेगळे पैसे दिले जातात.