मुंबई -टॉलीवूड सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कामिनेनी हे टॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. राम चरण आणि उपासना यांनी 10 वर्षांपूर्वी एकमेकांशी लग्न केले होते. लग्नाला इतक्या वर्षानंतरही राम चरण आणि उपासना आई-वडील होऊ शकले नाहीत. त्यांना याबाबत नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि दोघेही या प्रश्नाची उघडपणे उत्तरे देतात. दरम्यान, उपासनाचे मुलाबाबतचे एक वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे.
उपासना म्हणाली की लोकसंख्या नियंत्रणामुळे तिला मुले नको आहेत. असं ती स्पष्ट म्हणाली होती. राम चरणनेही बेबी प्लॅनिंगवर असेच उत्तर दिले. याआधी राम चरण यांना बेबी प्लॅनिंगवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानेही अशीच उत्तरे दिली होती.
राम चरण एकदा या मुद्द्यावर मीडियाशी बोलताना म्हणाले की, तो मेगा स्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना खूश करणे ही त्याची जबाबदारी आहे. त्यांनी बाळाचे नियोजन करून कुटुंब वाढवले, तर त्यांचे लक्ष त्यांच्या ध्येयापासून वळवले जाईल. सिनेमा हे त्याचे पहिले प्रेम असल्याचे त्याने सांगितले. तर त्याची पत्नीही तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात व्यस्त आहे. म्हणूनच त्याला सध्या कुटुंब वाढवायचे नाही.