पुणे : स्टार फुटबाॅलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने १५ मिनिटात केलेल्या दोन गोलच्या जोरावर युव्हेन्ट्स संघाने ‘सिरी ए’ फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात ‘परमा’ संघाचा २-१ ने पराभव करत विजय नोंदवला.
La @juventusfc incassa la vittoria contro un @1913parmacalcio che non si arrende fino al fischio finale.@Cristiano apre con una doppietta il girone di ritorno, mentre Andreas #Cornelius segna il suo 7️⃣° gol stagionale per i crociati. 👏#JuveParma #WeAreCalcio pic.twitter.com/gbmY89d5Wv
— Lega Serie A (@SerieA) January 19, 2020
रोनाल्डोने सलग सातही सामन्यात गोल केलेले आहेत. साल २००५ नंतर तो असा कामगिरी करणारा युव्हेन्ट्सचा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी डेविडने १५ वर्षापूर्वी अशी कामगिरी केली होती. रोनाल्डोने या सामन्यात ४८ व्या आणि ५८ व्या मिनिटांला गोल केले तर ‘परमा’ संघाकडून एंड्रियास काॅर्नेलियसने ५५ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
🔚 FULL-TIME
We gave it all we've got but we return from the Allianz Stadium empty-handed.
Heads up boys, onto the next one! 💪#JuventusParma #ForzaParma 💛💙 pic.twitter.com/9XuhAoU7lz
— Parma Calcio 1913 (@ParmaCalcio_en) January 19, 2020
युव्हेन्ट्स संघाचा हा २० सामन्यातील १६ वा विजय आहे आणि त्यांचा संघ ५१ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. रोनाल्डो यूरोप लीगमध्ये सलग १४ व्या मोसमात कमीत कमीत १५ गोल करणारा पहिला फुटबाॅलपटू ठरला आहे. तो इटलीच्या आधी स्पेन मध्ये ला लीगा आणि इंग्लंड मध्ये प्रीमीयर लीग मध्ये खेळलेला आहे.