लेक्सिंगटन – अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची रंगीत तालीम समजल्या जात असलेल्या टॉपसीड टेनिस स्पर्धेतील बहुचर्चिक लढतीत अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्सने आपलीच बहीण व्हिनस विल्यम्सचा पराभव केला.
या दोघींतील हा महिला एकेरीचा 31 वा सामना ठरला. त्यात सेरेनानेच वर्चस्व राखले असून तिचा हा व्हिनसवरील 19 वा विजय ठरला. व्हिनसने आजपर्यंत सेरेनावर 12 वेळा विजय मिळवला आहे. या दोघी खूप वर्षांनंतर एकमेकींसमोर आल्या होत्या. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्येही त्यांची लढत सातत्याने गाजली आहे. मात्र, इथेची सेरेनाने 23 वेळा तर व्हिनसने केवळ 7 वेळा तर सेरेनाने 23 वेळा विजेतेपदे पटकावली आहेत.
शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील लढतीत सेरेनाने व्हिनसवर पहिला सेट गमावल्यानंतरही जबरदस्त खेळ करत 3-6, 6-3 व 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेकडे अमेरिकन ओपनची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. अमेरिकन स्पर्धेला येत्या 31 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे.